बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रसाद लाड यांच्या घरासमोर सापडला लाखांचा खजिना, वाचा सविस्तर

मुंबई | भाजपचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या घरासमोर लाखोंचा खजिना सापडल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. प्रसाद लाड यांच्या घराबाहेर पैशांनी भरलेली एक बॅग सापडल्याची माहिती समोर आली आहे. या बॅगेत रोकड, चांदी, सोने, चांदीच्या मुर्ती, देवादिकांच्या मुर्ती आहेत. सुरक्षारक्षकांनी लाड यांना यासंदर्भात माहिती देताच त्यांनी तात्काळ पोलीसांकडे धाव घेतली.

माटुंगा येथे प्रसाद लाड यांचे निवासस्थान आहे. सदर बॅग पहाटेच्या सुमारास लाड यांच्या घरासमोर सापडली. सुरुवातीला बॅग अनोळखी असल्याने भीतीचे वातावरण तयार झाले होते. याप्रकरणी पोलीस अजून तपास करत आहेत. अशाप्रकारे आमदारांच्या घरासमोर ही बॅग ठेवल्याने संशय व्यक्त केला जात आहे. आमदारांच्या निवासस्थानाला विशेष सुरक्षा असून देखील हा प्रकार कसा घडला याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लाड यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही पोलीस तपासत आहेत. लवकरच यामागे कोण आहे हे निष्पण्ण होईल असा पोलिसांचा अंदाज आहे. आज आषाढी एकादशी. आणि आजच्याच दिवशी पहाटे ही बेवारस बॅग सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही बॅग कोणाची, कोणी ठेवली, का ठेवली याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

दरम्यान, पंढरपूरात भाजप (BJP) आणि शिंदे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेे (Eknath Shinde) यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न झाली आहे. राज्यात सगळीकडे आषाढी एकादशीच्या निमित्ताने आनंदाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे भाजपचे आमदार आणि भाजप महाराष्ट्र राज्याचे उपप्रदेशाध्यक्ष प्रसाद लाड यांच्यावर अरिष्ठ कोसळले आहे.

थोडक्यात बातम्या – 

बळीराजाच्या सुखासाठी मुख्यमंत्र्यांचं विठुरायाला साकडं, पंढरपूरच्या विकासाबाबत केली महत्त्वाची घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा संपन्न, शिंदेंच्या चारही पिढ्या होत्या उपस्थित

आलियाच्या प्रेग्नंसीबाबत करण जोहरने केला मोठा खुलासा!

अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा हाॅट अंदाज; चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा पाऊस

“शिवसेनेत दोनच माणसं शिल्लक राहणार आहेत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More