बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रात अनलॉकला सुरुवात, पण ‘या’ 6 जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती चिंताजनक

मुंबई | गेल्या वर्षीपासून संपूर्ण देशभरात कोरोनाने हाहाकार माजवल्याचं चित्र पाहायला मिळालं. कोरोनामुळे पहिल्या लाटेसह दुसऱ्या लाटेतही अनेकांनी आपले प्राण गमावले. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊन घोषित केला होता. पण हळूहळू रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने महाराष्ट्र अनलॉक व्हायला सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये अनलॉक करण्यात येणार असल्याचं सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. परंतु, महाराष्ट्र जरी अनलॉक होत असला तरी महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये कोरोना परिस्थिती चिंताजनक असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा आणि पुणे या जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती चिंताजनक असल्याचं दिसून येत आहे.

सध्या दर आठवड्याला कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्ह्याचे स्तर निश्चित करण्यात येत आहेत. त्यानुसार सोमवारपासून अनेक जिल्ह्यांचा स्तर बदलण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. पुणे शहरातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने महानगरपालिकेने निर्बंधांमध्ये शिथिलता दिली. परंतु, जिल्ह्यातील परिस्थिती ही काही प्रमाणात चिंता वाढवणारी असल्याने पुण्यासह इतर पाच जिल्ह्यांमध्येही नागरिकांवर निर्बंधांची टांगती तलवार पाहायला मिळत आहे.

राज्य सरकार आता या सहा जिल्ह्यांमध्ये नेमके काय निर्बंध वाढवणार किंवा कोणत्या प्रकारचे नवे नियम लागू करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच महाराष्ट्र एकीकडे आणि अनलाॅकच्या दिशेने वाटचाल करत असताना या सहा जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक असल्याने प्रशासन ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी नेमकी काय पावले उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“‘या’ राज्यातील भाजपचं सरकार जाणार हे नक्की”

‘या’ शहरातील कोरोना आला आटोक्यात; सक्रिय रुग्णसंख्येत लक्षणीय घट

“उद्धव ठाकरे दिल्लीतून हात हलवत आले, मुख्यमंत्र्यांच्या मनात पाप”

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता; महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागणार?

“संभाजीराजे छत्रपती हे मान्य करत नसले तरी ऑन पेपर ते भाजपचेच खासदार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More