बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उष्णतेच्या लाटेसह राज्याला अवकाळी पाऊस झोडपणार, ‘या’ जिल्ह्यांना इशारा जारी

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात कमालीचा बदल पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागात रखरखतं ऊन आणि काही भागात अवकाळी पाऊस असं काहीसं विचित्र वातावरण सध्या राज्यात आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘असनी’ चक्रीवादळाचा मान्सूनवर काहीही परिणाम होणार नसल्याचं पुणे वेधशाळेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात पुढचे काही दिवस अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) इशारा देण्यात आला आहे.

पुणे, नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये 13 मे पर्यंत अवकाळी पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. तर कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढचे दोन दिवस अवकाळी पाऊस बरसणार आहे. तसेच मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्रातील काही भागात 13 मे पर्यंत अवकाळी पावसाची उपस्थिती असेल. तर अकोला व अमरावती या जिल्ह्यांमध्ये पुढचे चार दिवस उष्णतेची लाट (Heat Wave) येणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना सतर्क करत काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘जेव्हा आदित्य ठाकरेंना तुरूंगात टाकण्यात येईल तेव्हा…’; नवनीत राणांना संताप अनावर

देशातील महागाईचं सदाभाऊ खोत यांनी केलं समर्थन, म्हणाले…

“NIA कारवाईतून दिग्गज नेत्यांची नाव उघड होणार”

मुंबईचं टेन्शन वाढलं! फाॅर्मात असलेला हुकमी एक्का स्पर्धेबाहेर

चक्रीवादळाचा ‘या’ तीन राज्यांना बसणार फटका, अलर्ट जारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More