Top News देश

संजय राऊत तुम्ही उत्तर प्रदेशची काळजी नका करू, महाराष्ट्र सांभाळा!- योगी आदित्यनाथ

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशातील बुलंदशहर भागात दोन साधूंना मारण्यात आलं. यावरून चांगलच राजकारण तापलं होतं. गावातील मंदिरात साधूंची बॉडी सापडल्याने खळबळ उडाली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पालघरच्या घटनेचा दाखला पकडत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चिमटे काढले. राऊतांच्या या चिमट्यावर आदित्यनाथांनी त्यांना चांगलंच सुनावलं दिलं आहे.

उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य आहे. बुलंदशहर घटनेनंतर अवघ्या काही तासांमध्येच आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सांभाळा उत्तर प्रदेशची चिंता करु नका, अशा शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी संजय राऊत यांना सुनावलं आहे.

उत्तर प्रदेशातील घटना भयंकर असून याला कोणीही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करु नये. पालघरमध्ये असा प्रकार झाला होता, असं ट्विट संजय राऊतांनी केलं होतं.

दरम्यान,बुलंदशहर जिल्ह्यातील पगोना गावातील शिव मंदिरात गेल्या 10 वर्षांपासून जगनदास आणि सेवादास हे दोन साधू वास्तव्यास आहे. दोन्ही साधू मंदिरातील धार्मिक विधी करत होते. सोमवारी मध्यरात्री मंदिर परिसरात दोघांना जीवे मारण्यात आलं.

 

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

पैशांचा तुटवडा असल्याने राहुल गांधींनी घेतली 1,000 रुग्णांची जबाबदारी

ही लढाई कोरोनाविरुद्धची नव्हे तर निसर्गा विरोधातील- मोहन आगाशे

महत्वाच्या बातम्या-

“कोरोनाविरुद्ध लढाईत फडणवीस रस्त्यावर दिसण्याऐवजी राजभवनातच जास्त दिसतात”

धक्कादायक! पुण्यात आज सापडलेल्या कोरोनाच्या रुग्णांचा आकडा चिंताजनक

कोटामध्ये अडकलेले 60 विद्यार्थी बीडमध्ये परतले; कुटुंबियांना मोठा दिलासा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या