बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

UP Election Result 2022: उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा हादरा

नवी दिल्ली | पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल हातात यायला सुरूवात झाली आहे. तर सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) भाजपने (BJP) सुरूवातीपासूनच मुसांडी मारल्याचं चित्र दिसत आहे. मात्र, गांधी घराण्याच्या पारंपारीक मतदारसंघाला धक्का बसल्याचं म्हटलं जात आहे.

उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी हे गांधी घराण्याचे पारंपारिक मतदारसंघ मानले जातात. गांधी घराण्याच्या या पारंपारिक मतदारसंघात काँग्रेस (Congress) उमेदवार तिसऱ्या स्थानावर आहेत तर भाजप उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे हा काँग्रेस व गांधी घराण्यासाठी मोठा धक्का समजला जात आहे.

काँग्रेसमधून नुकत्याच भाजपमध्ये आलेल्या आदिती सिंह रायबरेलीतून 4 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर अमेठीत समाजवादी पार्टीचे उमेदवार 1 हजारांपेक्षाही जास्त मतांनी आघाडीवर आहेत. (UP Election Result 2022)

दरम्यान, उत्तर प्रदेशात सात टप्प्यात 403 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्या होत्या. उत्तर प्रदेशात भाजप आणि समाजवादी पक्षात थेट लढत पाहायला मिळत आहे. सध्या भाजप आघाडीवर असून उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“योगी पुढे जाणार हे नक्की होतं, पण….”; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

UP Election Result 2022: निकालापूर्वी अखिलेश यादव याचं ट्विट चर्चेत

“छत्रपतींचा विचार म्हणजे रात्री गाड्या फिरवायच्या, मोठ्याने गाणी लावायची असं आहे का?”

युद्ध सुरू असतानाच रशियाने केली ‘ही’ मोठी घोषणा!

मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More