नवी दिल्ली | आज संपूर्ण देशाचं लक्ष पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांवर लागून आहे. त्यामुळे सध्या राजकीय हालचालींना मोठा वेग आल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेनेनं आपल्या पक्षाचा विस्तार महाराष्ट्राबाहेरही करण्याचा निर्णय घेतला असून सध्या महाराष्ट्राबाहेर त्यांचा फ्लाॅप शो दिसत असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे.
उत्तर प्रदेशात भाजपची आघाडी पहायला मिळत असून शिवसेनेला अद्याप आपलं खातं खोलता आलेलं नाही. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य करताना उत्तर प्रदेश आणि गोव्यात मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या होत्या. पण याचा फायदा शिवसेनेला अद्याप तरी होताना दिसत नाही.
उत्तर प्रदेशात आदित्य ठाकरे यांनीही प्रचार सभा घेतल्या होत्या. मात्र त्याचाही काहीच फायदा झाल्याचं दिसत नाहीये. त्यामुळे पहिल्या दीड तासात शिवसेनेच्या उमेदवारांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेर फ्लॉप शो कायम असल्याची चर्चा रंगली आहे.
भाजपला 222 जागांवर आघाडी मिळाली आहे. त्याचबरोबर समाजवादी पक्षाची आघाडीही निवडणुकांमध्ये ‘काँटे की टक्कर’ देत आहेत. समाजवादी पक्ष 111 जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे, निवडणूक आयोगाच्या मते, सपाला 31 टक्के मते मिळाली आहेत, तर भाजपला 42 टक्के मते मिळाली आहेत.
थोडक्यात बातम्या –
“योगी पुढे जाणार हे नक्की होतं, पण….”; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
UP Election Result 2022: निकालापूर्वी अखिलेश यादव याचं ट्विट चर्चेत
“छत्रपतींचा विचार म्हणजे रात्री गाड्या फिरवायच्या, मोठ्याने गाणी लावायची असं आहे का?”
युद्ध सुरू असतानाच रशियाने केली ‘ही’ मोठी घोषणा!
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर
Comments are closed.