महाराष्ट्र मुंबई

थोरातांची परवानगी घेत काँग्रेसकडून लढताना वाचलेला निधी उर्मिलांनी CM फंडात दिला!

मुंबई | काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढल्यानंतर उरलेला निधी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिला आहे.

उर्मिला यांनी 20 लाख रुपयांचा उरलेला निधी मुख्यमंत्री फंडात दिला असून हा निधी देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची परवानगी घेतली आहे.

उर्मिला मातोंडकर यांनाही 50 लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता. मात्र, त्यातील त्यांनी फक्त 30 लाख रुपये खर्च केले होते. त्याचा हिशोबही त्यांनी निवडणूक आयोगाला वेळोवेळी दिला होता.

निवडणुकीत 30 लाख रुपये खर्च झाल्यानंतर 20 लाखांचा निधी उरला होता. त्यातच राज्यात कोरोनाचं संकट उद्भवलं. त्याचा राज्याला मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे त्यांनी हा 20 लाखांचा उरलेला निधी मुख्यमंत्री निधीत देण्याचा निर्णय घेतला.

थोडक्यात बातम्या-

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, कोव्हिशील्ड लसीच्या निर्यातीवर बंदी

टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे तिसऱ्या खेळाडूची कसोटी मालिकेतून माघार

‘…तेव्हा तुमचे मुख्यमंत्री झोपा काढत होते का?’; सुभाष देसाई यांनी भाजपला फटकारलं

तेजस्वी सातपुते यांनी पोलीस दलासाठी घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; गृहमंत्र्यांनीही केलं कौतुक

नागपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांची निवड ऑनलाईन होणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या