नवी दिल्ली | नविन कृषी कायद्याविरोधात शेतकरी गेल्या दोन महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. परंतू अजुनही मोदी सरकारनं यावर कोणताच तोडगा काढला नाही. याच पार्श्वभूमीवर पंजाबमधील एका शेतकऱ्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांना एक भावनिक पत्र लिहिलं आहे.
त्या पत्रात हीराबेन मोदी यांनी आपला मुलगा नरेंद्रला कृषी कायदे रद्द करण्यास सांगावं, असा आग्रह करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी यांचं मन वळविण्यासाठी आपल्या सर्व शक्तींचा उपयोग त्या एक आई म्हणून करतील, अशी अपेक्षाही शेतकऱ्यानं व्यक्त केली.
पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील रहिवासी हरप्रीत सिंह यांनी हे पत्र लिहिलं आहे. देशाच्या एकूण विकासात शेतकऱ्यांचे योगदान आणि इतर अनेक मुद्दे पत्रात लिहिलं आहेत.
हरप्रीत सिंह म्हणाले की, “:मी हे पत्र जड अंत:करणानं लिहित आहे. आपणास ठाऊक असेल की, शेतकरी थंडीतही दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. यात 90-95 वर्षांच्या आजोबांपासून ते मुलांपर्यंत आणि महिलांचाही समावेश आहे.”
थोडक्यात बातम्या-
“तमिळनाडूचं भविष्य इथले युवा ठरवतील, त्यांच्या मदतीला आता मी आलो आहे”
ममता बॅनर्जीचा वीक पॉइंट भाजपने ओळखलाय, दीदींनी चिडायला नव्हत पाहिजे- संजय राऊत
“ज्यांच्याबरोबर लढायचं त्यांचेच लोक फोडून फौज तयार करायची
बॉयफ्रेंडसाठी सख्ख्या मैत्रिणीची केली हत्या; हत्येचं कारण ऐकून पोलीसही हादरले
“रोहित पवारांचा नकलीपणा बघायचा असेल तर हे नक्की वाचा”