मुंबई | नशा येण्यासाठी गुटख्यामध्ये पालीची शेपटी टाकली जाते, असा धक्कादायक दावा शिवसेना आमदार अनिल परब यांनी केलाय. त्यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडालीय.
मी ज्या विभागात राहतो तिथं गुटखा तयार करणारी अनेक ठिकाणं आहेत. तंबाखूवर वेगवेगळी केमिकल्स वापरुन नशा आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यानी हे प्रकार पाहिलेत. अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी मोक्का लावायला हवा, असं अनिल परब म्हणाले.
दरम्यान, गुटखाबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांना मोक्का लावण्याची तयारी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दर्शवली.
Comments are closed.