बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अन्य राज्यात अडकलेल्या यूपीच्या मजुरांसंदर्भात योगी सरकारचा मोठा निर्णय

लखनऊ | अन्य राज्यात अडकलेल्या उत्तर प्रदेशच्या मजुरांसाठी योगी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या मजुरांचा 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपला आहे, अशा मजुरांना उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्या घरी घेऊन जाण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत त्यांनी याबाबत निर्णय घेतला.

इतर राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांना उत्तर प्रदेशमध्ये आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना आखल्या जाव्यात, असा आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

इतर राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांच्या टेस्टिंगची सुविधा व्हाव्यात, त्यांना सुखरुप उत्तर प्रदेशमध्ये आणलं जाईल. उत्तर प्रदेशमध्ये हे मजुर आल्यानंतर त्यांना बसमार्फत त्यांच्या जिल्ह्यात किंवा गावात पोहोचवलं जाईल, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More