मोदींनी ‘अशाप्रकारे’ केले जनतेला 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन पूर्ण- व्ही. के. सिंह

पुणे | नागरिकांच्या बँक खात्यावर 15 लाख रुपये जमा करण्याच्या प्रश्नावर केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

भाजप सरकारने सर्व सामान्यांना तेल, तांदूळ, गहू, तूरदाळ या जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कधीही कमी पडू दिला नाही आणि भावही स्थिर ठेवले. याची तुलना केल्यास याची रक्कम 15 लाखांपेक्षा जास्तच भरेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

नागरिकांच्या बँक खात्यावर 15 लाख रुपये जमा होणार का?, या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर सिंग यांनी हे उत्तर दिलं आहे.

दरम्यान, भाजप सरकारच्या 55 महिन्यांच्या काळात जितका विकास झाला तितका विकास 55 वर्षांच्या काळात झाला नाही, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

राहुल गांधींना ‘चौकीदार चोर है…’ हा उद्घोषच ‘पंतप्रधान’पदी बसवणार?

-कमळ कधीच फुलणार नाही; बारामतीत पोस्टरबाजीतून भाजपला इशारा

सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना घरावर भाजपचा झेंडा लावावा लागणार??

‘हे’ माजी उपमुख्यमंत्री पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर?

-आघाडीला ‘राज’ साथ देणार का? अजित दादांचं आमंत्रण स्विकारणार?

Google+ Linkedin