बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ग्रामसेवकांची रिक्त पदे भरण्यात येतील- अजित पवार

मुंबई | ग्रामसेवकांनी ग्राम कृषी संजीवनी समितीत सदस्य सचिव म्हणून काम करावं. ग्रामसेवकांची रिक्त पदे प्राधान्याने भरण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ग्रामसेवक युनियन पदाधिकाऱ्यांच्या अडचणी समजून घेतना अजित पवारांनी रिक्त पद भरण्यात येण्याची ग्वाही दिली आहे.

गावातील कामं मार्गी लावावीत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत ग्राम कृषी संजीवनी समिती स्थापन करून अंमलबजावणी करण्याबाबत अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं.

ग्रामीण भागाच्या विकासासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी समिती गठित करावी. त्या समितीत सदस्य सचिव म्हणून ग्रामसेवकांनी जबाबदारी स्वीकारून कामकाज सुरू करावं. अकोला, अमरावती बुलढाणा, जालना, जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या समित्या गठित करण्याची प्रक्रिया गतिमान करून त्या समित्यांचं काम प्राधान्यानं करावं, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अजित पवारांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामसेवक युनियनने काम सुरू करण्यास तयारी दर्शवली आहे.

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

‘सिंधूला थार भेट द्यावी’, युजरच्या मागणीवर आनंद महिंद्रा म्हणाले, ‘तिच्या गॅरेजमध्ये…’

…त्यामुळे व्यापाऱ्यांच्या धमक्यांना घाबरत नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा पुण्याची आजची आकडेवारी

मुंबई कोरोनामुक्त होतंय! नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट; वाचा आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More