पुणे महाराष्ट्र

भाजपमध्ये जाणाऱ्या पिचडांचं शरद पवारांबद्दल मोठं वक्तव्य

अहमदनगर | आपण सत्ताधारी पक्षात जावं ही जनतेची इच्छा आहे. कधी-कधी कटू निर्णय घ्यावे लागतात. तो घ्यायची वेळ आली आहे. मात्र आपण शरद पवारांचे उपकार कधीही फेडू शकत नाही, अश्या भावना वैभव पिचड यांनी भाजपात प्रवेशाची घोषणा करताना व्यक्त केल्या.

शरद पवारांच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास झाला आहे. खांद्याला खांदा लावून काम केलं. लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराला 32 हजारांचं लीड दिलं, असंही वैभव पिचड म्हणाले आहेत.

विरोधीपक्षाचा आमदार म्हणून काम करताना विकास कामांना खिळ बसली. अनेक कामं प्रलंबित आहेत. मतदारसंघातले प्रश्न सोडवण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. त्यामुळे आपण भाजपत जात असल्याचं पिचड यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, आज घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं पिचड यांनी जाहीर केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून भाजपने जोरात इनकमिंग चालवलंय- सुशीलकुमार शिंदे

-“अडचणीचा काळ असला तर काय झालं, आम्ही साहेबांच्या सोबत आहोत”

-राजीनाम्याच्या निर्णयानंतर चित्रा वाघ सोशल मीडियावर ट्रोल!

-रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीनं दिली बढती; ‘या’ महत्वाच्या पदावर निवड

-एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये जाणार???; ‘या’ नेत्याचा दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या