मुंबई | नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकप्रकरणी वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यां तिघांना 10 दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश विनोद पाडळकर यांनी पोलिस कोठडी सुनावली आहे.
या आरोपींकडे सापडलेले स्फोटकं नेमकं कशासाठी आणण्यात आले होते?, कुठं घातपात करण्याचा विचार होता, या संपुर्ण प्रकरणापाठीमील खरे सुत्रधार कोण आहेत?, हे शोधण्यासाठी या तिघांना 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, वैभव राऊतला खोट्या आरोपाखाली फसवण्यात आलं आहे, असा आरोप करत काल नालासोपाऱ्यात हिंदुत्ववादी संघटनेने भव्य असा मोर्चा काढला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
-गुजरातनेही केली केरळसाठी 10 कोटी रूपयांची मदत जाहीर
-1997 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं; भाजप महापौरांनी तोडले अकलेचे तारे
-केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी केरळमधील मंत्रीही रस्त्यावर!
केरळच्या मदतीला महाराष्ट्र धावला; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!
-पिंपरीत पोस्टर लावणारा ‘शिवडी’चा ‘मजनू’ अखेर सापडला