कुठवर संयम राखायचा; अॅड सदावर्तेंवर हल्ला करणाऱ्या वैजीनाथ पाटीलचा सवाल

मुंबई | सगळ्या गोष्टी संयमाने होत नसतात. आम्ही कुठवर संयम राखायचा?, असा सवाल वैजीनाथ मुकणे पाटीलने केला आहे. तो टीव्ही 9 या वृत्तवाहिनीसोबत बोलत होते. 

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी हे सर्वकाही स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केलं आहे. 50 टक्क्यांच्या वर आरक्षण देण्याला त्यांचा विरोध आहे. मग आधीचं 52 टक्के आरक्षण त्यांना कसं चालतं?, असा सवालही वैजीनाथनं केला. 

अॅड. सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या वैजीनाथनं त्यांच्यावर उच्च न्यायालयाच्या आवारात हल्ला चढवला होता. 

सर्वांना सोबत घेऊन चालतो, अन् आम्हालाच मारता का तुम्ही? भरपूर वाट बघितली, आमच्या पिढ्या बरबाद व्हायला लागल्या. काही काही मुलांना मराठा समाजात जन्माला येऊन चुकी केली वाटते, असंही तो म्हणाला. 

महत्वाच्या बातम्या 

-महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठं भगदाड पडणार???

-वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदमचं विजयानंतर शिवरायांच्या चरणी लोटांगण

-हत्तीची दोन घरांची चाल; अन् मध्य प्रदेशच्या सत्तापटावर काँग्रेसचं भाजपला चेकमेट!

-पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखण्याची क्षमता काँग्रेसमध्ये नाही- ओवैसी

थापा मारून सदा सर्वकाळ विजयी होता येत नसतं; सामनातून शिवसेनेचा हल्लाबोल