बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ब्लॅक फंगसपासून वाचायचं असेल तर ‘या’ पदार्थांचं सेवन करू नका; डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

नवी दिल्ली | कोविडमधून रिकव्हर झाल्यानंतर ब्लॅक फंगस होऊ नये असं वाटत असेल तर त्यांनी थंड पदार्थ खाऊ नये. या साथीच्या संसर्गाच्या दरम्यान, त्यांनी थंड पाणी किंवा फ्रीजमधून काढलेली कोणतीही थंड वस्तू खाऊ नये, असं बंगळुरुच्या जीवनोत्तमा आयुर्वेद केंद्राच्या वैद्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.

तेलात तळलेले खाद्यपदार्थ देखील ब्लॅक फंगसला प्रोत्साहित करतात. तसेच फळे आरोग्यासाठी पूर्णपणे फायदेशीर असतात. पण थंड फळे ब्लॅक फंगसच्या रूग्णाला धोकादायक ठरू शकतात. गरम पाण्याने धुतल्यानंतर त्यांना खाणं चांगलं होईल. म्हणून नेहमीच फळं धुतल्यानंतरच त्याचं सेवन करा, असं कुलकर्णी म्हणालेत.

म्यूकोरमायकोसिसमध्ये साखरेचं अतिसेवन करणं आरोग्यासाठी नुकसान कारक ठरू शकतं. साखरेचं जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे शरीरात काळ्या बुरशीची वाढ अधिक होते. म्हणून सध्या साखरेचं प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांचं सेवन करणं थांबवा, असं त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, ब्लॅक फंगस कोविड रुग्णांसाठी जीवघेणा ठरत आहे. यामुळे लोक डोळे गमावू शकतात. आरोग्य तज्ञ स्टिरॉइड्स आणि मधुमेह याला मुख्य कारण म्हणून देत आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘कोरोनाची तिसरी लाट आली तरी…’; उद्धव ठाकरेंचा उद्योजकांना सल्ला

‘महागाईच्या भडक्यात बेरोजगारीची लाट, लोकांना काम देण्याची गरज’; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

“बाळासाहेबांनी काँग्रेसला गाडून टाका सांगितलं होतं, खुर्चीसाठी तुम्ही त्यांचे विचारच गाडून टाकले ”

‘दररोज सामन्यापुर्वी…’; सिक्सर किंग युवराजने दिला भारतीय संघाला मोलाचा सल्ला

‘बिल्डरने वेळेवर घर दिलं नाही तर…’; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More