फक्त ‘भारतमाता की जय’ बोलणे म्हणजे राष्ट्रप्रेम नाही!

मुंबई | फक्त ‘भारत माता की जय’ असा जयघोष करणे म्हणजे देशप्रेम नाही, असं मत उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं आहे. ते मुंबईतील जमनालाल बजाज वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.

फक्त जयघोष करणे किंवा चित्रपट पाहूण चित्रपटगृहाबाहेर येऊन ‘जय हिंद’ बोलणे म्हणजे देशप्रेम नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मते प्रत्येकाने स्वत:चे काम प्रामाणिकपणे करणं, हे खरं देशप्रेम आहे, असं त्यांनी सांगितलं.

‘भारत माता की जय’ म्हणजे देशातील 130 कोटी जनतेचा विकास करणे. हा देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाचा खरा अर्थ आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. 

दरम्यान, त्यासोबत परकीय गुंतवणुकीच्या काळात आपण देशातील छोट्या उद्योजकांनाही मदत केली पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-दीपिका आणि रणवीरच्या लग्नाला शुभेच्छा देण्यासाठी मला वेळ नाही!

-तुम्ही भांडत बसा, समृद्धी महामार्गाचं नावही आम्हीच ठेऊ!

-सपना चौधरीच्या कार्यक्रमात गोंधळ; चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू

-विनोद तावडेच म्हणतात शिक्षक-प्राध्यापक चोर; अजित पवारांचा गौप्यस्फोट

-युवराज सिंग आणि गौतम गंभीरला मोठा झटका; IPL संघांमधून हकालपट्टी