परभणी | आम्ही तिसऱ्या टप्प्यातील पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरु करत आहोत. हा टप्पा यशस्वी झाल्यानंतर चौथी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा आम्ही विचार करू, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
शिक्षकांच्या आरटीपीसीआर तपासण्या झाल्या आहेत. पालकांनीही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवताना मास्क बांधूनच पाठवावं, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
पूर्ण काळजी घेऊन हे वर्ग सुरु करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
राज्यात शालेय शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीच्या शाळा 23 नोव्हेंबरपासून कोरोनाच्या नियमावलीसह सुरु केल्या आणि यामध्ये सुदैवाने कोणताही वाईट अनुभव न आल्याने 22 हजार 204 शाळेत सध्या 22 लाख विद्यार्थी उपस्थित राहत आहेत.
थोडक्यात बातम्या-
“हा माणूस कृषी मंत्री होता याचं आश्चर्य वाटतं, इतक्या निर्लज्जपणे शेतकऱ्यांबद्दल बोलतोय”
‘शीतल आज तू हवी होतीस’; लेकीसाठी विकास आमटेंची भावनिक पोस्ट
आपल्या इथं काही लोकांची शॉर्ट मेमरी असते, ते…. – अजित पवार
खऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीतून सीमांवर परत यावं- अमरिंदर सिंग
“गुप्तचर यंत्रणेने माहिती देऊनही गृहखात्याने दखल घेतली नाही”