बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी सुसंस्कृत घरातला, राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे”

मुंबई | मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी प्रकरणावरून भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी वरुण सरदेसाईंवर गंभीर आरोप केले आहेत. याला आता वरूण सरदेसाईंनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत नितेश राणेंवर सडकून टीका केली आहे.

राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे दाखल आहे, खुद्द फडणवीसांनीच हे मांडलंय, आज ते भाजपमध्ये गेलेत तर महाविकास आघाडीतील विविध नेत्यांवर आरोप करत आहेत. गेले काही दिवस ते माझ्यावर वैयक्तिकरीत्या आरोप करत आहेत. राणे कुटुंबीयांना जनता अजितबात गांभीर्यानं घेत नाही. त्यांना भीक घालत नाही, अशी टीका वरूण सरदेसाईंनी केली आहे.

मी सुसंस्कृत कुटुंबातील आहे. मला राजकारणाची आवड आहे. पण आज जे आरोप केले तसे कामं माझ्याकडून घडणारही नाहीत, असं वरूण सरदेसाईं यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आरोप केलेत, ते सिद्ध करावेत नाही तर कायदेशीर प्रक्रियेला तयार राहावे, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर अतिशय घाणेरडे आरोप केलेत. ते सगळे आरोप तथ्यहीन असून, त्या आरोपांमुळे मी आमदार नितेश राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकत आहे, असंही वरुण सरदेसाई यांनी यावेळी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीतून आता रिकाम्या हाताने परत जाऊ नये’; ‘या’ राज्यपालांचं मोठं वक्तव्य!

नरेंद्र सिंह तोमर आणि राकेश टिकैत यांच्यात जुंपली, म्हणतात…

डान्स करताना उर्वशी रौतेलासोबत नको ते घडलं, पाहा व्हिडीओ

ओए चारो तरफ घुम के बॅट दिखा; जेव्हा विराट इशान किशनकडे बघून ओरडतो, पाहा व्हिडीओ

औरंगाबाद जिल्ह्यातील तपासणी दौऱ्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी लागु केले ‘हे’ नवे निर्बंध

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More