मुंबई | पवई पोलीस ठाण्यातील एका कॉन्स्टेबलला भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीवरून राजकारण तापण्याची चिन्हं आहेत. त्यानंतर भाजप आमदार राम कदम यांनी संबंधित कॉन्स्टेबलला केलेल्या फोनचं संभाषण व्हायरल झालं आहे. याच पार्श्वभूमीवर युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी भाजपवर टीका केली आहे.
मुंबई पोलिसांना आधी शिव्या आणि आता तर भाजप कार्यकर्त्यांनी थेट पोलिसांवर हल्ला केला. भाजपचा आपल्या मुंबई पोलिसांवर इतका राग का आहे?, असं वरूण सरदेसाई यांनी म्हटलं आहे.
ह्या घटनेचा निषेध करावा तितका कमी. सगळ्या आरोपींना अशी कठोर शिक्षा व्हावी की पुन्हा कोणाची असली हिम्मत होता कामा नये, असंही सरदेसाई यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात देसाई यांनी ट्विट केलं आहे.
दरम्यान, वरूण सरदेसाई यांना राज्य सरकारने एक्स दर्जाची सुरक्षाव्यवस्था दिली आहे. यावरून भाजप नेत्यांनी सरकारवर टीका केली आहे.
मुंबई पोलिसांना आधी शिव्या आणि आता तर भाजप कार्यकर्त्यांचा पोलिसांवर थेट हल्ला ?!?
भाजपचा आपल्या मुंबई पोलिसांवर इतका राग का?
ह्या घटनेचा निषेध करावा तितका कमी.
सगळ्या आरोपींना अशी कठोर शिक्षा व्हावी की पुन्हा कोणाची असली हिम्मत होता कामा नये! https://t.co/68q9CNeNKh— Varun Sardesai (@SardesaiVarun) January 11, 2021
थोडक्यात बातम्या-
नविन पॉलिसीवर व्हॉट्सअॅपने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण; नवीन पॉलिसी केवळ….
सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला मोठा धक्का!
“राऊतांनी उड्या मारु नयेत, आम्ही स्वयंभू आहोत आम्हाला ठाकरे सरकारची गरज नाही”
आशिष शेलार शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
व्हॉट्सअपला धक्क्यावर धक्के; पहिलं स्थानही गमावलं, हे अॅप बनलं नंबर वन!