वसंत मोरे ऑन फायर! चंद्रकातदादा म्हणाले, “वसंत तुम्ही भाजपात या, मी म्हणालो…”
ठाणे | गेल्या काही दिवसांपूर्वी मनसेमध्ये पाडवा मेळाव्यानंतर मोठा गोंधळ झाला होता. मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या मस्जिदीवरील भोंग्याच्या विषयावरून पुण्याचे नगरसेवक वसंत मोरे नाराज असल्याची चर्चा होती. पण वसंत मोरेंनी या सर्व अफवा असल्याचं ठाण्यातील सभेत भाषण करून दाखवून दिलं आहे.
वसंत मोरेंनी आपल्या भाषणादरम्यान विविध विषयांवर भाष्य केलं आहे. चर्चेतील चेहरा हा पुरस्कार मिळाला तेव्हा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मला ऑफर दिल्याचं म्हटलं आहे. वसंत तुम्ही भाजपात या, असं पाटील म्हणाले होते, असं मोरे म्हणाले आहेत.
आम्ही केवळ दोन नगरसेवक पुणे महापालिकेत आहोत पण आमच्या कामाचं कौतूक सर्वत्र होत आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना मागं टाकत आम्ही कोंडवा भागात आम्ही विकास केला आहे. मनसेच्या मागं ठामपणे उभं राहा, असं आवाहन मोरेंनी केलं आहे.
दरम्यान, शिवाजी पार्कवर राज ठाकरेंच्या सभेनंतर आता ठाण्यात मनसेनं सभा घेतली आहे. यावेळी बोलताना मोरेंनी आपण नाराज नसल्याचं दाखवून दिलं आहे.
थोडक्यात बातम्या –
“सदावर्तेंच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 50 हजार रूपये बक्षीस देणार”
रुपाली चाकणकर यांची चित्रा वाघ यांच्यावर घणाघाती टीका, म्हणाल्या…
“संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांवर दबाव टाकून…”; प्रवीण दरेकरांचे गंभीर आरोप
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आयसीयू सेंटरचे भूूमिपूजन होणार!
“प्रकाश आंबेडकरांनी मुलावर कशाप्रकारचे संस्कार केलेत?”
Comments are closed.