बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्यावरून घेतलेल्या भूमिकेनंतर मनसेचे वसंत मोरे (Vasant More) यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर वसंत मोरे यांना मनसे पुणे शहराध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात आलं. वसंत मोरे दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या असताना मोरे यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली.

वसंत मोरेंनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जात आधी शर्मिला ठाकरेंची (Sharmila Thackeray) भेट घेतली व त्यानंतर राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर मी 100 टक्के समाधानी असल्याचं वसंत मोरेंनी जाहीर केलं आहे.

मला सर्वच पक्षांकडून ऑफर आहेत. पण या ऑफर आजच आहेत असं नाही. मात्र, या भेटीनंतर सर्व ऑफर संपल्या आहेत असं म्हणत वसंत मोरेंनी मनसेतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तर राज ठाकरेंनी त्यांच्या उत्तर सभेला बोलावलं असल्याचंही वसंत मोरे म्हणाले आहेत.

दरम्यान, राज ठाकरेंच्या भेटीनंतर फोटो शेअर करत वसंत मोरेंनी त्याला ‘आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही’, असं कॅप्शन दिलं आहे. वसंत मोरे यांनी राज ठाकरेंची भेट घेत त्यांची बाजू स्पष्ट केली व त्यानंतर ते मनसे सोडणार नसल्याचं जाहीर केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

देशातील कोरोना रूग्णांबाबत ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर

“मातोश्रीत बसून सत्ताफळं खाणाऱ्यांनी लाखालाखांच्या जाहीर सभा घेऊन दाखवाव्यात”

महाराष्ट्रातील ‘या’ भागात अवकाळी पाऊस कोसळणार

‘गोरं मूल जन्माला यावं म्हणून सानियाने…’, शोएब मलिकचा खुलासा

सिनेसृष्टी हादरली, मुलाच्या मृत्यूच्या 2 महिन्यातच ‘या’ अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More