बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शाकाहारी’ महिलेला चुकून ‘मांसाहारी’ पिझ्झा डिलिव्हर करणं पडलं महागात!

गाझियाबाद | गाझियाबादमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने तिला नॉन व्हेज पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या अमेरिकी पिझ्झा हबकडे तब्बल एक कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. महिलेने याप्रकरणी ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली आहे. सध्या ही घटना सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरली आहे.

गाझियाबादच्या रहिवाशी दिपाली त्यागी या शाकाहारी असून त्यांनी 2 वर्षांपूर्वी 21 मार्च 2019 रोजी होळीच्या दिवशी एका अमेरिकी पिझ्झा हबमधून व्हेज पिझ्झा ऑर्डर केला होता. पिझ्झा डिलिव्हरीला उशीर झाला होता, पण भूक लागल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करत आम्ही सगळे पिझ्झा खायला बसलो. पण पिझ्झामध्ये मशरुमऐवजी मांस असल्याचं मला पहिला घास खाताना जाणवलं, असं दिपाली यांनी एनआयशी बोलताना सांगितलं.

दिपाली यांचे वकील फरहत वारसी यांनी ग्राहक कोर्टाला सांगितले की, याबाबत महिलेनं पिझ्झा कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून तक्रारही केली होती, मात्र कंपनीनं या बाबीकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही. चार दिवसांनी पिझ्झा आउटलेटच्या व्यवस्थापकांनी दिपाली यांना फोन केला आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला मोफत पिझ्झा देण्याची ऑफर दिली. परंतु या घटनेमुळे मानसिक त्रास वाढला असून आयुष्यभर महागडे धार्मिक विधी करावे लागतील, असं सांगत त्या महिलेने ऑफर नाकारली, अशी माहिती वकिलांनी दिली.

दरम्यान, दिपाली यांच्या तक्रारीनंतर दिल्लीच्या जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने पिझ्झा आउटलेटला महिलेच्या तक्रारीवर उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 मार्च रोजी ठेवण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या – 

सलग 9 दिवस 18 जणांनी केला बलात्कार; राजस्थानमधील घटनेनं देश हादरला!

चाहत्यानं दिलेलं गिफ्ट पाहून रितेश देशमुख झाला भावूक; पाहा व्हिडीओ

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यावर अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण!

पुण्यात क्वारंटाईन सेंटरमधून पळून जाताना 18 वर्षीय तरुणी ग्रीलमध्ये अडकली अन्…, पाहा व्हिडीओ

“शरद पवारांनीच अनिल देशमुखांना तात्काळ घरी पाठवावं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More