Top News महाराष्ट्र

“मंंत्र्यांच्या गाडीसाठी त्वरित जीआर निघतो, आम्हा शिक्षकांच्या पगाराला नियम फार”

यवतमाळ | शिक्षणमंत्र्यांसाठी नवीन कार खरेदी करण्याचा जीआर तातडीने जारी करण्यात येतो, मात्र विनाअनुदानित शिक्षकांसाठी तरतूद करूनही पगाराचा जीआर जारी करण्यासाठी नियम दाखवले जातात. यामुळे राज्यातील बिनपगारी शिक्षक संतापले असून बीएडधारक बेरोजगारांनी सोशल मीडियातून याविरुद्ध आवाज उठवलाय.

शालेय शिक्षण विभागाने 3 जुलै रोजी शिक्षणमंत्र्यांसाठी नवीन गाडी खरेदी करणे आणि त्यासाठी धनादेश संबंधित कंपनीला देण्याबाबतचा जीआर काढला. हाच जीआर ट्विटवर पोस्ट करून डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनने आपला संताप नोंदवलाय. ‘शिक्षणमंत्र्यांना २२ लाखांची गाडी घेण्यासाठी अर्थ मंत्रालयाची लगेच परवानगी मिळते. पण रखडलेल्या शिक्षक भरतीची फाईल दोन महिन्यांपासून अर्थ मंत्रालयात परवानगीसाठी धूळखात पडून राहते,’ असं ट्विट असोसिएशनचे राज्य अध्यक्ष संतोष मगर यांनी केलंय.

गेल्या 20 वर्षांपासून विनाअनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये बिनपगारी काम करणाऱ्या शिक्षकांसाठी गेल्या अधिवेशनात वेतन अनुदानाची तरतूद करण्यात आली. मात्र अजूनही त्यासाठी जीआर जारी न झाल्याने या शिक्षकांना पगार मिळालेला नाही.

शिक्षकांचे, बेरोजगार शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित ठेवून शिक्षण मंत्री लाखो रुपयांची गाडी खरेदी करीत आहेत, या विरोधात शुक्रवारी 10 जुलै रोजी डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या निकषांमुळे हे आंदोलन प्रत्येक बेरोजगार आपापल्या घरी आपल्या पदव्या जाळून त्याचे फोटो व्हायरल करणार आहेत, अशी माहिती असोसिएशनचे राज्याध्यक्ष संतोष मगर यांनी दिली. शिवाय याबाबत रविवारी मुख्यमंत्र्यांना इमेलही पाठवण्यात आला.

ट्रेंडिंग बातम्या-

‘आत्मनिर्भर’च्या नावाखाली भाजपकडून कोकणवासियांची दिशाभूल- अनिल परब

वाट्टेल ती किंमत मोजून ठाकरे सरकार पाडण्यासाठी पैजा लागल्यात, पण …- संजय राऊत

महत्वाच्या बातम्या-

‘या’ नेत्याची जीभ घसरली, निर्मला सीतारमण यांची केली काळ्या नागिणीशी तुलना

धक्कादायक! पुण्याच्या महापौरांपाठोपाठ कुटुंबातील आठ जणांना कोरोनाची लागण

100 जणांना वाढदिवसाची पार्टी देणाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या