बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतात पेरणी करतानाचा एकनाथ शिंदे यांचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

मुंबई | काही दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्याचे आमदार श्रीनिवास वनगा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यांच्या शेतात सध्या भाताच्या पेरणीची कामं सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर श्रीनिवास वनगा त्यांच्या आईसोबत शेतातील चिखलात उतरत भाताची पेरणी करताना दिसले होते. आता राज्याच्या मंत्रीमंडळातील एका मंत्र्याचा पेरणी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते शेतात पेरणी करताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे शेतीच्या कमात रमल्याचं दिसत आहे.

काही मंडळींचं मार्गदर्शन घेत आपण पेरणी व्यवस्थित करत तर आहोत ना, याबाबतचे प्रश्न विचारत एकनाथ शिंदे पेरणी करताना दिसत आहेत. त्यांचा हा अंदाज अनेकांची मनं जिंकत आहे.

शिवसेना नेते अशी ओळख असण्यासोबतच राज्याच्या मंत्रीमंडळातही त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. असं असतानाही आपल्या समाजातील घटकांसोबत वावरण्याचा त्यांचा हा अंदाज कायमच अनेकांना आवडतो. पावसाळा सुरु झाल्या क्षणापासून आपलं शिवार, शेत खुलवण्यासाठी म्हणून शेतकरी शेतीच्या कामांना लागला आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

पुणे विद्यापीठात फिरायला यायचं असेल तर यापुढे पैसे द्यावे लागणार!

“प्रकाश आंबेडकरांशी आघाडी करण्यासाठी लवकरच चर्चा करणार”

“शरद पवार देशाचे पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच होईल”

“प्रकाश आंबेडकरांना नको तिथे नाक खुपसून प्रसिद्धीत राहण्याची घाण सवय”

“कोरोनातून बरे झालेल्यांना लस देण्याची आवश्यकता नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More