बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशात सतर्कतेचं वातावरण, परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर राहणार विशेष लक्ष

नवी दिल्ली | संपुर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान घातल्याचं पाहायला मिळत होतं. त्यातच आता हळूहळू कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. पण आता दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आल्याने चिंता आणखी वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा बी 1.1529 हा नवा विषाणुचा प्रकार आढळला आहे.

जगभरात डेल्टा विषाणुने थैमान घातल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यातच आता हा नवा विषाणु डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक धोकादायक आणि वेगाने पसरत जाणारा असल्याचं बोललं जात आहे. आतापर्यंत या नव्या विषाणुचे 77 रुग्ण आढळून आले आहेत. ज्यापैकी बहूतांश रूग्ण दक्षिण आफ्रिकेतील असून काही हाॅंगकाँगमधील असल्याची माहिती समोर आली आहे.

भारतात आता नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. तसेच त्यांची तपासणीही करण्यात येणार आहे. फेब्रूवारी किंवा मार्च महिन्यात भारतात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, आता कोरोनाचा धोका वाढू नये आणि कोरोना महामारीचा फैलाव आणखी होऊ नये, यासाठी काळजी घेण्याचं काम सरकारतर्फे करण्यात येत आहे. तसेच नव्या व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन देशातील सर्वच राज्यांना पत्र लिहून केंद्र सरकारने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच परदेशी पर्यटक आणि प्रवाशांवर लक्ष ठेवण्याच्या सुचनाही दिल्या आहेत.

थोडक्यात बातम्या

‘कोई सहरी बाबू दिल-लहरी बाबू हाय रे’ गाण्यावर रोहित, श्रेयश आणि शार्दुलचे जोरदार ठुमके, पाहा व्हिडीओ

मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळेंना उच्च न्यायालयाचा दणका; दिले ‘हे’ आदेश

नाना पटोले यांनी गडकरींविरोधात दाखल केलेल्या याचिकेबाबत ‘ही’ माहिती आली समोर

परळीच्या वैद्यनाथ मंदिराला बाॅम्बने उडवण्याच्या धमकीनंतर धनंजय मुंडे म्हणतात…

“50 लाख रुपये द्या नाहीतर परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर आरडीएक्सनं उडवेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More