भारतात माझ्या जीवाला धोका; विजय मल्ल्याचा नवा कांगावा

लंडन | भारतात माझ्या जीवाला धोका आहे, असा नवा कांगावा कर्जबुडव्या विजय मल्ल्याने सुरु केलाय. वेस्टमिनिस्टर न्यायालयात मल्ल्या प्री-ट्रायलसाठी आला असताना त्याच्या वकिलानी पत्रकारांना ही बाब सांगितली.

भारतीय बँकांना 9 हजार कोटी रुपयांचा गंडा घालून विजय मल्ल्या भारतातून पसार झालाय. त्यामुळे त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मात्र विजय मल्ल्या यामध्ये अडथळे आणण्याचे प्रयत्न करत आहे. 

दरम्यान, माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप निराधार असल्याचा दावाही विजय मल्ल्याने केलाय.