बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मला पण योगदान देऊ द्या’; पंतप्रधान मोदींच्या पॅकेजवर मल्ल्याचं ट्वीट

नवी दिल्ली | कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधानांनी 20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. उद्योग जगतातल्या अनेकांनी या पॅकेजचं स्वागत केलं आहे. यानंतर आता कोट्यवधी रुपयांचं कर्ज बुडवून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्यानंदेखील सरकारचं अभिनंदन केलं आहे.

सरकारनं माझ्यासारख्या उद्योगपतीकडे दुर्लक्ष का करतंय, असा प्रश्न विजय मल्ल्यानं उपस्थित केला आहे. ‘कोविड-19 चा सामना करण्यासाठी जाहीर केलेल्या पॅकेजबद्दल सरकारचं अभिनंदन, असं ट्विट विजय मल्ल्यानं केलं आहे.

सरकार कितीही नोटा छापू शकतं. पण सरकारी बँकांकडून घेतलेलं 100 टक्के कर्ज परत करण्याची तयारी दर्शवणाऱ्या व्यक्तीकडे सरकार दुर्लक्ष का करतंय? कृपया मी देत असलेला पैसा विनाअट घ्या आणि हे सगळं संपवा, असं मल्ल्यानं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, विजय मल्ल्याला फरार घोषित करण्यात आलं असून त्याच्यावर सरकारी बँकांचे जवळपास 9 हजार कोटी रुपये बुडवल्याचा आरोप आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

प्रवासी मजुर आणि फेरीवाल्यांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा!

शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

महत्वाच्या बातम्या-

PM केअर फंडामधून तब्बल ‘एवढ्या’ कोटींचं वाटप तर व्हेंटिलेटरच्या खरेदीसाठी 2000 कोटी- PMO कार्यालय

‘रोज सकाळी उचलली जीभ लावली टाळ्याला’; आशिष शेलारांची संजय राऊतांवर टीका

शंभूराजांच्या जयंतीदिनी उद्धव ठाकरे यांची बिनविरोध निवड झाली याचा मनोमन आनंद- जयंत पाटील

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More