बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तिची लायकी नाही की…’, विजय वडेट्टीवारांनी भडकून केलं स्फोटक विधान

मुंबई | प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तसेच त्यावरून तिच्यावर चहूबाजूने टीकेची झोड उठली आहे. त्यातच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्याचा खरपूस समाचार घेत भडकून स्फोटक विधान केलं आहे.

कंगना रनौतच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ‘कोणी नाचणारी बोलतेय , त्यावर मी उत्तर देऊ इच्छीत नाही’, असं मोठं विधान केलं आहे. त्यामुळे कंगनाच्या वक्तव्याचा वाद थांबत नसल्याचं पाहायला मिळत आहे. कंगनाने देशाला स्वातंत्र्य हे भिकेनेच मिळालं आहे, असं मोठं आणि वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तसेच तिच्या विधानामुुळे वाद पेटला आहे.

भगतसिंह यांना फाशी द्यावी, अशी महात्मा गांधींची इच्छा होती, असं आक्षेपार्ह विधान तिने केलं होतं. त्यावरून आता तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. विजय वडेट्टीवार यांना संताप अनावर झाल्याने असं बोलण्याची तिची लायकी नाही, असं म्हटलं आहे. तसेच हे बोलणं म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखं आहे, असं विधान त्यांनी केलं आहे.

दरम्यान, कंगना रनौत हि गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या आणि टीकेच्या केंद्रस्थानी असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच सोशल मीडियावरील पोस्टमुुळे ती मोठ्या प्रमाणात ट्रोलही होत आहे. त्यात मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हा वाद आणखी पेटण्याची शक्यता वर्तवण्य़ात येत आहे.

थोडक्यात बातम्या

“मंत्री झगमगाटात पण विद्येचं माहेरघर अंधारात”

अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात गुन्हा दाखल; पत्नीने केले ‘हे’ गंभीर आरोप

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर परिणाम काय?

ज्या न्यायाधीशांनी अनिल देशमुखांना घरचं जेवण नाकारलं त्यांना थेट बदली करूनच पाठवलं

खळबळजनक! 10 हजार द्या अन् बोगस कोरोना रूग्ण घ्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More