‘महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे, त्यामुळे…’; विजय वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य
मुंबई | राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. तसंच मुंबई लोकलच्या फेऱ्याही कमी करण्याबाबत विचार सुरु असल्याचं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
कोरोना रोखण्यासाठी सरकार उपाययोजना करत आहे. उपाययोजना जरी सुरु असल्या तरी त्याचा रिझल्ट काय होईल, हे आज सांगता येत नसलं तरी महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे, असं आपल्याला म्हणता येईल, असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं.
आताच्या स्थितीत लॉकडाऊन परवडणारं नाही, अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे पण रुग्ण वाढ होतीय, हे गंभीर आहे. राज्यातील काही शहरात कडक निर्बंध घ्यावे लागतील, असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
मुंबईत लोकलमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.
मंत्री संजय राठोड यांच्यावर प्रश्न विचारला असता वडेट्टीवार यांनी थेट प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालणार नाही. पोहरादेवीच्या गर्दीला जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असंही विजय वडेट्टीवार म्हणालेत.
थोडक्यात बातम्या-
“आम्ही आमच्या घरालाही मोदींचं नाव देऊ, तुमच्या पोटात का दुखतंय”
साेशल मीडिया, ओटीटी, न्यूज पाेर्टल्सवर सरकारची असणार करडी नजर; वाचा नवी नियमावली
अभिमानास्पद! काश्मीर खोऱ्यात जिल्हाधिकारीपदी मराठामोळे संतोष सुखदेवे
आज ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं; पाहा काय आहे भाव…
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बंधूंचा काँग्रेसला रामराम; ‘या’ पक्षात केला प्रवेश
Comments are closed.