महाराष्ट्र मुंबई

अहमद पटेल यांचं योगदान काँग्रेस पक्ष विसरू शकणार नाही- विजय वडेट्टीवार

मुंबई | अहमद पटेल यांच्या निधनाने पक्षासाठी एकनिष्ठ असलेला नेता गमावला असून एक विद्वान राजकारणी आणि एका अभ्यासू, बुद्धिमान व परखड नेतृत्वास देश मुकला आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास सद्गती देवो, अशा शब्दात मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली.

अहमदजी हे साधे गृहस्थ नसून, ते एक विद्वान राजकारणी होते. सर्वांत कठीण काळात ते पक्षासोबत उभे राहिले होते. मृदूभाषी, व्यवहार चतुर आणि नेहमी हसतमुख राहणं ही त्यांची वैशिष्ट्यं होती. अतिशय शांत, कुशाग्र आणि तीव्र राजकीय भान असलेले नेते होते. त्यांचं जाणं हे काँग्रेससाठी नुकसान करणारं आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय.

अहमद पटेलजींच्या निधनाने देशाचं न भरून येणार नुकसान झालं आहे. अहमद पटेल यांनी देशाची अविरतपणे आणि नि:स्वार्थी हेतूनं सेवा केली आहे. त्यांनी समाजाची सेवा करत सार्वजनिक आयुष्यात अनेक वर्षं घालवली. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि काँग्रेसला सक्षम करण्यातील त्यांची भूमिका यामुळे ते नेहमीच लक्षात राहतील, असं वडेट्टीवार म्हणाले.

काँग्रेसचे आधारवड अहमद पटेलजीं त्यांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणार नाही, असं वडेट्टीवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

“भाजपच्या 120 नेत्यांची यादी देतो, तुमच्याही चौकशा होऊन जाऊ द्या”

जेवढ्या चौकशा करायच्या त्या करा, आम्ही घाबरत नाही- संजय राऊत

ईडीच्या लोकांनी घरी छान नाश्ता, जेवण केलं….; प्रताप सरनाईकांचा खुलासा

मुंबई- महाराष्ट्रावरही कोरोनाची टांगती तलवार, शिवसेनेचा सर्तकतेचा सल्ला

विशेष पथके नेमून तातडीने आष्टीतील बिबट्याला जेरबंद करा- धनंजय मुंडे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या