मुंबई | काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष पदावरून अंतर्गत राजकारण तापू लागलं आहे. अशातच काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पक्षनेतृत्वाकडे मोठी मागणी केली आहे.
मंत्रिपद ठेवून प्रदेशाध्यक्षपद दिलं तर ठीक अन्यथा मंत्रिपद सोडायला तयार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. ‘झी24’ तास ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
काँग्रेस पक्षानं प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली तर न्याय देईन. पक्षानं प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी चेहरा द्यावा, अशी मागणीही वडेट्टीवारांनी केली आहे. एकूनच काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी वडेट्टीवारांनी दंड थोपटलेत.
दरम्यान, काँग्रेसकडे आधी 38 टक्के ओबीसी मतदार होता. यातील आता फक्त 12 टक्के ओबीसी मतदार राहिला आहे. त्यामुळे ओबीसी मतदारांना आकर्षित करावं लागणार असून संघटना बांधणीकडे लक्ष देण्याची इच्छा वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.
थोडक्यात बातम्या-
‘धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्या नाहीतर…’; भाजपचा मुख्यमंत्र्यांना इशारा
ढोंगी धनंजय मुंडेंना शिक्षा मिळणारच- रेणू शर्मा
राम कदमांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून रोहित पवारांनी साधला निशाणा, म्हणाले…
“आमच्याविरूद्ध तीन पैलवान एकत्र आले तरी आम्ही पुणे महानगरपालिका जिंकू”
धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार पोलिसांनी नाकारली; रेणू शर्मा यांचं पोलीस आयुक्तांना पत्र