Top News महाराष्ट्र सोलापूर

आधी शिवसेनेत आणि नंतर राष्ट्रवादीचा प्रचार, पाटील आता काँग्रेसमध्ये दाखल!

सोलापूर | दिवंगत माजी सहकारमंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र यांचे पुत्र डॉ. धवलसिंह मोहिते पाटील उद्या म्हणजेच 28 जानेवारीला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

मुंबई काँग्रेस भवनमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत धवलसिंह प्रवेश करणार आहेत. डॉ. धवलसिंह मोहिते पाटील महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष आहेत.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केल्यानंतर धवलसिंह मोहिते पाटील आता काँग्रेसचा हात धरणार आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात रंगत येणार आहे. पाटलांनी जनसेवा संघटनेच्या माध्यमातून महत्त्वांच्या तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांची फळी उभी केली आहे.

दरम्यान, धवलसिंह मोहिते पाटील यांच्या रुपाने सोलापूर जिल्ह्यात युवा चेहरा देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. प्रतापसिंह मोहिते पाटील यांना मानणारे अनेक जुने जाणते कार्यकर्तेही पुन्हा काँग्रेसमध्ये येतील, अशी आशाही काँग्रेसला आहे.

थोडक्यात बातम्या-

भारतातील ‘या’ शहरात पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या पार

“बळाचा वापर करुन आंदोलन चिरडल्यास गंभीर परिणाम

काँग्रेस सूडाच्या भावनेतून शेतकऱ्यांच्या आडून हिंसाचार घडवत आहे- सुधीर मुनगंटीवार

आंदोलन भडकावल्याचा आरोप असलेला दीप सिद्धू आणि भाजपचा संबंध काय?

प्रियकर-प्रेयसीचं नको ते सुरु होतं, तेवढ्यात नवऱ्यानं ठोठावलं दार; घडला धक्कादायक प्रकार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या