Top News देश राजकारण

विकास दुबेचं मुख्यमंत्री कनेक्शन, ‘या’ राजकीय पक्षात होता दुबेचा चांगलाच दरारा!

कानपूर | उत्तर प्रदेशातील मोस्ट गँगस्टर आणि कानपूर एन्काऊंटर प्रकरणातील प्रमुख आरोपी विकास दुबेचा एन्काऊंटर झालेला आहे. कानपूर परिसरात दहशत माजविणारा विकास गेली 30 वर्ष गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधीत होता. सुरूवातीच्या काळात हा कुख्यात गुंड बसपाच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या निकट असल्याचा दावा आता केला जात आहे. तसंच मायावती मला नावानिशी ओळखतात. तसंच माझ्या मित्रांना त्या उमेदवारी देखील देतात, असंही दुबेने सांगितलं होतं.

विकास दुबे हा बहुजन समाज पक्षाचे माजी आमदार हरिकिशन श्रीवास्तव यांच्या गोटातील विश्वासाचा व्यक्ती होता. श्रीवास्तव यांच्या विरोधातील भाजपचे उमेदवार संतोष शुक्ला यांची दुबेनं २००१ मध्ये पोलिस स्टेशनमध्येच गोळ्या झाडून हत्या केली.

दुबेला अटक करण्याची पोलिसांची हिंमत झाली नाही. शेवटी २००२ मध्ये दुबेनं स्वतःच पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं. यादरम्यान मायावतींना मुख्यमंत्री पदाचा मान मिळाला होता. दुबे पोलिस स्टेशनात आत्मसमर्पण करायला आला तेव्हा त्याच्यासोबत बसपातील अनेक नेते मंडळी देखील असल्याचा दावा केला गेला.

पोलिस स्टेशनात आल्यावरही मुख्यमंत्री मला कधीच नाराज करणार नाहीत, असं दुबे छातीठोकपणे सांगत असे. या विधानावरून दुबेचा बसपातील असलेला दरारा स्पष्ट दिसून येत असे. दुबेच्या एन्काऊंटरनंतर त्याच्या राजकीय व्यक्तींशी असलेल्या संबंधांच्या चर्चांना आता चांगलंच उधाण आलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

उत्तर प्रदेश पोलिसांचा मला अभिमान…, एन्काऊंटरनंतर शहीद पोलिस जवानाच्या वडिलांची प्रतिक्रिया

क्रूरतेचा हैवाण होता विकास दुबे; हत्येनंतर 5 मृतदेहांसोबत जे केलं ते ऐकून अंगावर काटा येईल!

विकास दुबे एन्काऊंटर प्रकरण; 4 पोलीस जखमी

विकास दुबे हत्याकांड; काल ‘या’ व्यक्तीनं केली एन्काऊंन्टरची मागणी, आज झाली सत्य घटना…

कसा मारला गेला विकास दुबे?, जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

विकास दुबेला घेऊन जाणाऱ्या गाडीला अपघात; पळून जाणाऱ्या दुबेचा एन्काऊंटर!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या