Top News मुंबई

ठाकरे सरकारने आतातरी भानावर यावं- विखे पाटील

मुंबई | प्रशासनाने कोरोनाविरोधी लढ्याच्या समन्वयात लोकप्रतिनिधी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी करवून घेण्याऐवजी त्यांना आरोपीच्या पिंजयात उभे केलं. तिथे प्रशासन करेल तेच खरं असं चित्र तयार झालं आहे. ही अवस्था अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने आतातरी भानावर येऊन कोरोनाविरोधातील समाजातील सर्व घटकांना  एकत्र करून घावे, असं आवाहन भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे.

महाराष्ट्रात कोरोनाविरोधी लढ्यात कार्यरत असलेल्या यंत्रणेत आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात अजिबात समन्वय नाही. त्यामुळेच मुंबई व पुणे ही राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची शहरे अडचणीत आली आहेत. आपत्ती व्यवस्थापनाचे राज्यातील हे मोठे अपयश आहे. सरकारने आपत्ती व्यवस्थापन म्हणजे प्रशासन, अशी व्याख्या केली असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

आकस्मिकपणे आलेले कोरोनाचे संकट एकट्या राज्यावर व देशावर नाही. विकसित राष्ट्रासह अख्ख्या जगावर हे संकट आहे. त्यामुळे या संकटाचा सामना जात, धर्म, प्रांतभेद विचारात न घेता एकोप्याने करावा लागेल. जगभरात लाखो जणांचे प्राण कोरोनामुळे गेले. भारतातही मोठ्या प्रमाणात जीवितहानी होईल, असा अंदाज व्यक्त होत होता.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लाकडाऊनसारखे निर्णय वेळीच घेण्यात आले.  मोदींच्या या  निर्णयाची व कार्यपद्धतीची जगभर प्रशंसा होत असल्याचंही विखे म्हणाले.

पंधरा हजार एसटी बस लावल्यात थंबीला राज्यातील अनेक मजूर परराज्यांत त्यांना उत्पन्नाचे साधन नाही. परराज्यांतील मजूर व विद्यार्थ्यांना आणण्यासाठी ठोस उपाययोजना नाही. त्यासाठी सरकारी पातळीवर योग्य तो समन्वय नाही. लाखो कर्मचारी कामाअभावी घरात बसून आहेत. या बस कार्यरत करून परराज्यात अडकलेल्या विद्यार्थी आणि मजुरांना आणायला हवं. सामुदायिक प्रयत्नातून आपण हे सहजपणे करू शकतो, असा दावा विखे पाटील यांनी केला.

ट्रेंडिंग बातम्या-

‘ते 25 लाख परत द्या’; कोरोनासाठी दिलेली मदत भाजप आमदाराने परत मागितली

ही लढाई कोरोनाविरुद्धची नव्हे तर निसर्गा विरोधातील- मोहन आगाशे

महत्वाच्या बातम्या-

“कोरोनाविरुद्ध लढाईत फडणवीस रस्त्यावर दिसण्याऐवजी राजभवनातच जास्त दिसतात”

धक्कादायक! पुण्यात आज सापडलेल्या कोरोनाच्या रुग्णांचा आकडा चिंताजनक

कोटामध्ये अडकलेले 60 विद्यार्थी बीडमध्ये परतले; कुटुंबियांना मोठा दिलासा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या