बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हा देश कधीही हिरवा होणार नाही, हा देश भगवा राहिला पाहिजे”

मुंबई | ज्येष्ठ मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनी आज आपला 75 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी धर्माबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचीच सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. त्यामुळे नव्या वादाल तोंड फुटण्याचीही शक्यता आहे.

विक्रम गोखले यांनी लालबहादूर शास्त्री यांना सोडून देशातील इतर सर्व पंतप्रधानांना शंभर पेक्षा कमी गुण देतो, असं म्हटलं आहे. तसेच लाल बहादूर शास्त्री यांची 2 ऑक्टोबरला येणारी जयंती ही हेतूपुरस्पर पुसली जाते आणि त्याचा विसर पाडला जातो. हे किती वर्षाचं कारस्थान आहे. असं विक्रम गोखले यांनी बोलून दाखवत हा देश हिरवा होणार नाही, हा देश भगवाच राहीला पाहिजे, असं मत व्यक्त केलं आहे.

आपल्या देशाचा इतिहास बाबरापासून सुरू होतो आणि तो छापलाही जातो, हे दुर्देवी असल्याचं म्हणत त्यापुर्वी कोणी नव्हतं का?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे विक्रम गोखले यांच्या वक्तव्यावरून अनेकांनी आपल्या भूवया उंचावल्या आहेत. त्याचबरोबर आपण कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिल नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सत्तर वर्षात जे झालं नाही ते करून दाखवलं, असंही विक्रम गोखलेंनी यावेळी बोलताना म्हटलं आहे आणि शिवसेना व भाजपने एकत्र यावं यासाठी पुढाकार घेतला असल्याचंही त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. पण गोखले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता अनेक चर्चांना तोंड फुटलं आहे.

थोडक्यात  बातम्या

‘…तर सर्वस्वी जबाबदारी तुमची राहील’; गोपीचंद पडळकरांचा सज्जड इशारा

“मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेतलं असतं तर…”

नक्षलवाद्यांविरूद्ध कोम्बिंग ऑपरेशन! चकमकीत मिलींद तेलतुंबडे ठार झाल्याची माहिती

“तुला लईचं कळतं रं, आमच्या बारामतीत मी बोलायला लागलो की…”

कंगना राणावतच्या अडचणीत वाढ; काँग्रेसने केली पोलिसांकडे तक्रार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More