Top News

“बाळासाहेबांचा वारस असल्याचं सिद्ध करा, अन्यथा…”

औरंगाबाद | बाळासाहेबांचा वारस असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सिद्ध करावं. अन्यथा त्यांनी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडून द्यावी, अशी टीका शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे.

विनायक मेटे यांनी बीडसह शिरूर तालुक्यातील पौंडूळ, खांबा – लिंबा, खालापुरी या गावातील नुकसानीची पाहणी मेटे केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई सोडून शेतकऱ्यांच्या शेतात जावे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जात असत. उद्धव ठाकरे यांनी त्यांचा हा वारसा सिद्ध करावा, असं मेटे म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

हे सरकार अहंकाराच्या भावनांनी भरलेलंय, यांना मुंबईची चिंता नाही- प्रवीण दरेकर

…तर तेवातिया कोरोनावर लसही बनवेल- विरेंद्र सेहवाग

मुंबईची चित्रपटसृष्टी अन्यत्र हलवू देणार नाही- रामदास आठवले

महाराष्ट्रात पप्पू सेनेला माझ्याशिवाय करमत नाही का?- कंगणा राणावत

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या