Top News

“उद्धव ठाकरेंना आव्हान देणं हे योगी आदित्यनाथ यांना जमणार नाही”

मुंबई | महाविकास आघाडीच्या वर्षपुर्तीच्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. याच पार्श्वभूमीवर राणेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना खासदार विनायक राऊतांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबतही वक्तव्य केलं आहे.

योगी आदित्यनाथ मुंबईतील मोठे उद्योजक आणि बॉलिवूड कलाकारांची भेट घेणार आहेत. दरम्यान ही भेट म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तर आव्हान नाही ना?, असा सवाल विनायक राऊतांना माध्यामांकडून करण्यात आला.

उद्धव ठाकरेंना आव्हान देणं हे योगी आदित्यानाथ यांना जमणार नाही. मुंबई आणि फिल्म इंडस्ट्रीचं एक वेगळं नात आहे. त्यामुळे मुंबईचं महत्व कमी नसल्याचं राऊत म्हणाले.

दरम्यान, महाविकास आघाडी हे पाच वर्ष पुर्ण करणार आहे. मात्र माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सत्तापिसासू असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईत आलेला ‘ठग’”

भाजप खासदार आणि अभिनेते सनी देओल यांना कोरोनाची लागण

“बाबरीचे ढाचे कोसळताच बगला वर केलेल्यांची हिंदुत्वाची पोपटपंची हा विनोदच”

टेनिस व्हॉलिबॉल महासंघाच्या मुख्य कार्यकारिणीची निवड, सीईओपदी डॉ. व्यंकटेश वांगवाड!

आज तिसरा वनडे! व्हाईटवॉश टाळण्यासाठी कोहली अँड कंपनीला अखेरची संधी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या