मुंबई | मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या लढ्याला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी उद्धव यांचे आभार मानले . परंतू आता मात्र वेगळीच चर्चा सुरू झाली झालीये. ती म्हणजे विनोद पाटील शिवसेनेकडून विधानसभा लढणार…
औरंगाबाद लोकसभेत शिवसेनेचा पराभव झाला आहे. झालेला पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. तो पराभव पूर्वीचे सेना आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे झाला आहे, असं बोललं जात आहे. म्हणूनच जाधव यांना शह देण्यासाठी सेनेकडून विनोद पाटील यांना विधानसभेची उमेदवारी मिळू शकते, असं बोललं जातंय.
मराठा आरक्षण मिळवण्यात आणि कोर्टात मराठा आरक्षणाची बाजू झुंझारपणे मांडण्यात पाटील यांची महत्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे पाटील मराठा मतदारांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. याचाच फायदा शिवसेना घेऊ शकते.
दरम्यान, या चर्चांवर विनोद पाटील यांची कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.
महत्वाच्या बातम्या-
-…म्हणून ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता हॉटेलमध्ये भांडी घासतोय! ‘संघर्षाला सलाम…’
-“मुलं होण्यासाठी लग्न करण्याची गरज नाही; मी लग्नाच्या आधी आई होण्यास तयार”
-लोकसभेत पूनम महाजनांचा पंडित नेहरूंवर हल्लाबोल; म्हणाल्या…
-कंगनाकडून आदित्यने 1 कोटी रुपये उकळले; रंगोलीचा आरोप
-“यापुढे फक्त राहुल गांधींसाठी काँग्रेसचा सैनिक म्हणून काम करत राहणार”
Comments are closed.