“सेहगल यांना न बोलावल्यानं महाराष्ट्राचं नाक कापलं गेलं”

यवतमाळ | ज्येष्ठ लेखिका नयनतारा सेहगल यांना न बोलावल्यानं महाराष्ट्राचं नाक कापलं गेल्याचं वक्तव्य सांस्कृतिक राज्यमंत्री विनोद तावडे यांनी केलं आहे. यवतमाळ साहित्य संमेलनात ते बोलत होते. 

कार्यक्रमाला कुणाला बोलवायचं आणि कुणाला नाही यात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नसतो. त्यामुळे नयनतारा सेहगल प्रकरणात सरकारचं काही घेणं देणं नाही, असं तावडे म्हणाले आहेत.

नयनतारा सेहगल यांचं उद्घाटक म्हणून असलेलं निमंत्रण रद्द करण्यात आलं होतं. यावर विनोद तावडे यांनी आपलं मत व्यक्त केले आहे.

दरम्यान, संमेलनावेळी काही महिलांनी नयनतारा सेहगल यांचा मुखवटा घालून निषेध व्यक्त केला. 

महत्वाच्या बातम्या-

-…तर पुन्हा बॅट हातात घेणार नाही- विराट कोहली

-नरेंद्र मोदी स्वत:ची तुलना वाजपेयींशी करतात ही मोठी शोकांतिका- एम.के.स्टॅलिन

-CBI संस्था संकटात; 3 राज्यांनी घातली बंदी, इतरही बंदीच्या तयारीत

-दुबईमध्ये राहुल गांधींच्या कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद

-भुवनेश्वर कुमारनं एकदिवसीय सामन्यात घेतल्या 100 विकेटस