मुंबई | मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्तीसंदर्भात विनोद तावडेंनी मोठी घोषणा केली आहे. मराठा विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ न देणाऱ्या विद्यालयांवर कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिलाय.
शिष्यवृत्तीअंतर्गत 8 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांकडून 50 टक्के फी घेणं अपेक्षित आहे, मात्र काही विद्यालयं मराठा विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी घेत असल्याचं निदर्शनात आलं आहे.
दरम्यान, महाविद्यालयांकडून अशी फसवणूक होत असल्यास तक्रार करावी. यासाठी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती देखील करण्यात आली आहे, अशी माहिती विनोद तावडेंनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
आता परळीच मराठा आरक्षणाचं मुख्य केंद्र, सर्व चर्चा इथूनच होणार!
-परळीत बंदचे आवाहन करणाऱ्यांवर दगडफेक, 2 मराठा मोर्चेकरी जखमी
-दूध दरवाढीच्या मुद्द्यावर राजू शेट्टी आक्रमक, पुन्हा आंदोलन करणार
-मुख्यमंत्र्यांना मंदिरात जाण्यापासून रोखणं कितपत योग्य?; उपराष्ट्रपतींचा सवाल
-उद्या मुंबई बंद; मराठा क्रांती मोर्चाची घोषणा
Comments are closed.