बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

श्रीलंकेत पुन्हा एकदा जाळपोळ, संतप्त नागरिक रस्त्यावर

कोलंबो | आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत आता अराजकता माजली आहे. संतप्त नागरिक रस्त्यांवर उतरले आहेत. संतप्त नागरीकांनी पंतप्रधानांच्या घरात घुसून आग लावत तोडफोड केली आहे. तसेच राष्ट्रपती भवनात घुसत लोकांनी घोषणा देत आपला संताप व्यक्त केला आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी काल (09 जुलै) रोजी राजीनामा देत आपले राहाते निवासस्थान सोडून पळ काढला. ते सध्या अज्ञातवासात आहेत.

आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधानांच्या गाडीचेही नुकसान केले आहे. आंदोलनकर्त्यांचा राग काही केल्या शांत होत नसून श्रीलंकेत लोक संपुर्ण शहरात उतरुन आपला निषेध नोंदवत आहेत. आपण श्रीलंकेतील लोकांच्या सुरक्षेसाठी, आणि सरकार चालू ठेवण्यासाठी, राजीनामा देत असल्याचे विक्रमसिंघे यांनी सांगितले. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.

श्रीलंकेत सत्ताधारी सरकार पायउतार होऊन सर्वपक्षीय सरकार आणण्याची मागणी होत होती. त्या मागणीला पाठींबा दर्शवत विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिला. त्यापुर्वी त्यांनी एक निवेदन दिले आहे. बेटव्यापी इंधन वितरण या आठवड्यात पुन्हा चालू होणार आहे, तसेच जागतिक अन्न कार्यक्रमाचे संचालक या आठवड्यात देशाला भेट देणार आहेत. आयएमएफचा कर्ज स्थिरता अहवाल लवकरच तयार होणार आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे हे सुद्धा या जमावाचे बळी ठरले आहेत. आंदोलकांनी शनिवारी राष्ट्रपती भवनाला घेराव घातला. त्यानंतर राजपक्षे हे आपले अधिकृत निवासस्थान सोडून पळून गेले. श्रीलंकेच्या अध्यक्षांवर आंदोलकांचा मुख्य राग आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलक करत आहेत. राजपक्षे यांनी ही मागणी फेटाळली होती.

थोडक्यात बातम्या –

“शिंदेंना भेटण्यासाठी फडणवीसांनी दाढी-मिश्यासुद्धा लावल्या असतील”

भाजप नेत्याचा मोठा दावा, राष्ट्रवादी-काँग्रेसच्या गोटात खळबळ

प्रसाद लाड यांच्या घरासमोर सापडला लाखांचा खजिना, वाचा सविस्तर

‘उद्धव ठाकरेंना भेटणार का?’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

बळीराजाच्या सुखासाठी मुख्यमंत्र्यांचं विठुरायाला साकडं, पंढरपूरच्या विकासाबाबत केली महत्त्वाची घोषणा

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More