बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बॉयफ्रेंडसाठी तरूणींमध्ये भररस्त्यात तुंबळ हाणामारी; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

मुंबई | एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. भररस्त्यात तरुणींची एका तरुणासाठी जबरदस्त फायटिंग झाल्याचं व्हिडीओत दिसतंय.

रस्त्यातच या दोघी जणी आपसात भिडल्याचं पाहायला मिळतंय. त्यांनी एकमेकींचे केस देखील ओढले. . हातात काठी घेऊन एकमेकींना बदडूनही काढलं. रस्त्याला त्यांनी आखाडाच करून टाकला. तिथं उपस्थित असलेल्या कुणीतरी तरुणींच्या मारहाणीचा हा व्हिडीओ आपल्या कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

ही घटना उत्तराखंडच्या हल्द्वानीतील हिरानगरच्या पोलीस योगा पार्कातील आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तरुणींना मारहाण करण्यापासून रोखलं.

दरम्यान, तसेच त्यानंतर त्या एकमेंकींच्या झिंझ्या उपटतात. त्यानंतर ज्या तरुणीने आधी दुसऱ्या तरुणीला काठीने मारलं तिलाही काठीचा मार मिळतो. लाथाबुक्क्यांनीही त्या एमेकांना मारत आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

‘येत्या 9 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना 50 हजार मिळाले नाही, तर…’; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

ममता बॅनर्जींचा पाणीपुरी बनवतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

मोठी बातमी! दिपाली सय्यद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

खळबळजनक! सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एनसीबीचा मोठा खुलासा

आदित्य ठाकरेंवरील टीकेमुळे किशोरी पेडणेकर संतापल्या, म्हणाल्या…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More