बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेवटी आईच हो ती! सिंहाच्या जबड्यातून म्हशीने माघारी आणलं रेडकाला, पाहा थरारक व्हिडीओ

मुंबई | जगात आईशिवाय दुसरं कोणी निस्वार्थ प्रेम करत नाही. आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी आई काहीह करू शकते. फक्त माणसांमध्येच नाही तर प्राण्यांमध्येसुद्धा एक मादी आपल्या बाळाला जीव लावते. आपल्या बाळावर संकट आलं तर मादी आई कोणत्याही संकटाचा सामना करत बाळाला संकटातून बाहेर काढते. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

जंगलात एक म्हैस आपल्या वासरासोबत जात असताना अचानक जंगलातील सिंहाचा कळप त्यांच्या मागे लागतो. यामध्ये एक सिंह आणि सिंहिणी लागलेल्या दिसत आहे. एका सिंहाने रेडकाला तोंडात पकडलं आणि त्याला पळून घेऊन जात आहे. म्हशीने हे पाहिल्यावर तीचा पारा चढतो आणि आपल्या पिलाला वाचवण्यासाठी ती कोणताही विचार न करता जंगालाचा राजा असलेल्या सिंहाच्या मागे धावते.

ज्या सिंहाने तिच्या वासराला पळवलं. त्याच्या मागे ती धावत त्या जंगलात घुसली. तिने त्याला शोधून काढला आणि त्या सिंहाच्या जबड्यातून आपल्या वासराला सुखरूप बाहेर आणलं. सुरूवातील वाटलं आता वासरू काही माघारी बाहेर येणार नाही मात्र म्हशीने आपल्या जीव धोक्यात घालून रेडकाचा जीव वाचवला.

दरम्यान, आयएफस ऑफिसर सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आईचं धैर्य असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

एकवेळ सवलत मिळेल, पण वीजबिल माफ होणार नाही- नितीन राऊत

मालक शवासन करत असताना कुत्र्याला झाला गैरसमज, कुत्र्याने केलं अस काही की…, पाहा व्हिडीओ

भारतीय शास्त्रज्ञाची कमाल! 20 दिवसांत तयार केला खिशात बसणारा व्हेंटिलेटर

“हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा”

पुणेकरांसाठी खुशखबर; शहरातील निर्बंधांबाबत अजित पवारांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More