होय… विराट भारताला 2019 चा विश्वचषक जिंकून देऊ शकतो!!!

होय… विराट भारताला 2019 चा विश्वचषक जिंकून देऊ शकतो!!!

नवी दिल्ली | 2019 चा विश्वचषक इंग्लंडमध्ये होणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली हा विश्वचषक मिळवून देऊ शकतो, असं वक्तव्य वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीने केलं आहे. 

सॅमी सध्या यूएईमध्ये टी-10 क्रिकेट लीग स्पर्धेमध्ये खेळत आहे. तिथं त्याला विश्वचषकासह विराटबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यानं हे उत्तर दिलं. 

विराटकडे भारताला विश्वचषक जिंकून देण्याचे सर्व गुण आहेत, असं सॅमीने स्पष्ट केलं. 

दरम्यान, 2019 नंतर होणाऱ्या विश्वचषकात तो खेळेल की नाही, हे मला सांगता येणार नाही, मात्र विराट 2019 चा विश्वचषक भारताला नक्कीच जिंकून देऊ शकतो, असंही त्यानं नमुद केलं.

महत्वाच्या बातम्या-

-मुंबईचा समुद्र पाहिला की लाज वाटते- नितीन गडकरी

-नरेंद्र मोदी कोणत्या प्रकारचे हिंदू? राहुल गांधींचा सवाल

-तुमचं दुःख माझं, तुमच्यासाठी शेवटपर्यंत लढणार; तुम्ही पाहा आपणच जिंकणार!

-विमानतळाच्या धावपट्टीवर धावतेय चक्क ऑटो रिक्षा; पाहा व्हीडिओ-

-गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा अग्नीतांडव; जाळल्या 17 गाड्या

Google+ Linkedin