डिकवेलाची नाटकं बघून विराट कोहली रागाने लालबुंद!

कोलकाता | कधी भारताच्या तर कधी श्रीलंकेच्या बाजूने झुकणारी कोलकाता कसोटी अखेर अनिर्णित राहिली. मात्र या कसोटीला शेवटच्या दिवशी वादाचं गालबोट लागलं. 

भुवनेश्वर 19 वे षटक घेऊन आला तेव्हा श्रीलंकेची वाईट अवस्था होती. दिवस संपत आला होता मात्र पराभव टाळण्यासाठी विकेट टिकवून ठेवणं गरजेचं असल्यानं श्रीलंकन खेळाडू डिकवेलानं नाटकं सुरु केली. तो फलंदाजीला तयार होँण्यास वेळ लावत असल्याचं पाहून विराट कोहली चांगलाच भडकला होता. 

दरम्यान, पंचांनी मध्यस्थी करुन हा वाद सोडवला. मात्र श्रीलंकेची रणनीती काम करुन गेली. पंचांनी खराब हवामानामुळे लगेचच खेळ थांबवला.