Loading...

मिळालेल्या संधीचं मी सोनं केलं- विराट कोहली

पोर्ट ऑफ स्पेन | वेस्ट इंडिजविरूद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे 59 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात पहिल्यांदाच फलंदाजी करताना विराट कोहलीने  120 धावांची शतकी खेळी केली.

शिखर-रोहित हवीतशी सुरूवात करून देऊ शकले नाही. पहिल्या फलंदाजांपैकी कोणीतरी एकाने चांगली सुरूवात करणं गरजेचं असतं. दुसऱ्या सामन्यात मला ती संधी मिळाली. आणि मी मिळालेल्या संधीचं सोनं केलं, अशी प्रतिक्रिया विराट कोहलीने दिली आहे.

Loading...

नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. शिखर धवन स्वस्तात माघारी  परतल्यानंतर विराटने रोहित शर्मासोबत अर्धशतकी भागीदारी करत भारतीय संघाचा डाव सावरला.

दरम्यान, जेव्हा संघाला तुमची गरज असते त्यावेळी तुम्ही शतकी खेळी करता ही भावन कोणत्याही खेळाडूसाठी चांगलीत असते, अंस विराटने म्हटलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-इंटरनेट क्षेत्रात जिओचा नवा धमाका; ५ सप्टेंबरपासून जिओ फायबर सुरु

-रिलायन्स जिओचा आता डीटीएच क्षेत्रात धमाका; केली मोठी घोषणा

-रयतेच्या सेवेसाठी 5 कोटी खर्च करणार; संभाजीराजेंचा संकल्प

Loading...

-“कलम 370 हा म्हणजे राजकारणाचा नाही तर राष्ट्रहिताचा मुद्दा आहे”

-#EidAlAdha | ईदचा उत्साह; देशभरात नमाज अदा

Loading...