बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आरे भावा तुच जिंकलाय टॉस! टॉसदरम्यान गोंधळला विराट कोहली, पाहा व्हिडीओ

मुंबई |आयपीएल हंगामातील 16वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्समधील नाणेफेकीदरम्यान विराट कोहली गोंधलेला दिसला. वानखेडेच्या मैदानावर असलेल्या या सामन्याआधी संजू आणि विराट नाणेफेकीसाठी आले होते.

विराट कोहलीने टॉस जिंकला मात्र त्यावेळी विराटने संजूचं अभिनंदन केलं त्याचं अभिनंदन करत त्याला पुढे जाण्याची विनंती केली. संजूसुद्धा समलोचकांच्या समोर आला. मात्र तेव्हा दोघांच्या लक्षात आलं नक्की काय गडबड झाली आहे. त्यानंतर विराट सॉरी म्हणत पुढे आला आणि आपण प्रथम क्षेत्ररक्षण करणार असल्याचं सांगितलं.

मला नाणेफेक जिंकण्याची सवय नसल्यामुळे माझ्याकडून अशा प्रकारचा गोंधळ झाल्याचं विराटने सांगितलं. सामना सुरू झाला तेव्हा विराटने प्रथम क्षेत्ररक्षणाचा घेतलेला निर्णय सार्थ ठरवला. राजस्थानची सुरूवात एकदम खराब झाली. सलामीवर बटरल आणि वोहरा पुन्हा एकदा अपयशी ठरले तर कर्णधार संजू आजही दमदार खेळी करण्याच अपयशी ठरला. मात्र त्यानंतर शिवम दुबे आणि रियान परागने चांगली भागीदारी बनवली होती. मात्र अंतिम पाच षटकांच्या अगोदर दोघे बाद झाले.

दरम्यान, त्यानंतर आलेल्या राहुलव तेवतियाने आपले तेवर दाखवत 40 धावांची स्फोटक फलंदाजी केली. राजस्थानने बेंगलोरला 178 धावांचं लक्ष्य दिलं आहे. बेंगलोरतर्फे र्हषल पटेलने आणि सिराजने सर्वाधिक 3 बळी घेतले तर जमिसन, रिचर्डसन आणि सुंदरने एक बळी घेतला.

 

थोडक्यात बातम्या- 

चिंता वाढली… महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांमध्ये विक्रमी वाढ!

मोठी बातमी! ‘या’ राज्यातील प्रत्येक व्यक्तिला मोफत लस मिळणार, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

“लॉकडाऊनचा निर्णय मान्य, पण…”; अमृता फडणवीसांचा राज्य सरकारला सल्ला

उद्याचा पंतप्रधानांचा पश्चिम बंगाल दौरा रद्द; ऑनलाइन रॅलीचे आयोजन

आज पुण्यात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More