गुडगाव | षटकांची गती कमी असल्या कारणाने किंवा गैरवर्तन केल्याने दंड भरावा लागण्याचे प्रकार घडत असतात. मात्र विराट कोहलीला वेगळ्या कारणासाठी दंड ठोठावण्यात आला आहे.
विराटला पाणी वाया घालवल्याप्रकरणी गु़डगाव महानगरपालिकेने 500 रूपयांचा दंड ठोठावला आहे. विराटच्या घराबाहेर असलेल्या पाईपने वारंवार गाडी धुतल्याप्रकरणी आणि वारंवार पाण्याची नासाडी केल्याप्रकरणी त्याच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे.
विराटजवळ अनेक प्रकारच्या गाड्या आहेत. या गाड्या रोज महानगरपालिकेच्या पाईपमधून येणाऱ्या पाण्याने धुतल्या जातात. त्यामुळे शेकडो लिटर पाणी वाया जाते. यावर विराटच्या शेजाऱ्यांनी अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला पण विराटच्या मदतनिसांना काही फरक पडला नाही.
दरम्यान, विराटसह अन्य 10 जणांकडून पाणी वाया घालवल्याप्रकरणी दंड वसूल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
-विखेंचा भाजपप्रवेश मुख्यमंत्र्यांनी ठेवला वेटिंगवरच; म्हणतात…
-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात, भारतातील हवा आणि पाणी चांगलं नाही…
-RSS च्या लोकांसारखी चिकाटी हवी; त्यांच्याकडून काहीतरी शिका- शरद पवार
-“भाजपजवळ 303 तर शिवसेनेजवळ 18 खासदार; राम मंदिर करायला आणखी काय पाहिजे”
-सार्वजनिक बँकांना बुडवण्यात भाजप नेते पु़ढे; ‘या’ नेत्यावर काँग्रेसने केला आरोप
Comments are closed.