नवी दिल्ली | साऊदॅम्पटनमध्ये शनिवारी झालेल्या भारत विरूद्ध अफगाणिस्तान सामन्यात पंचांशी आवश्यकतेपेक्षा अधिक हुज्जत घालणं भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला महागात पडलं आहे.
आयसीसीच्या नियमभंग प्रकरणात विराट कोहलीला दोषी ठरवण्यात आलं आहे. विराटला सामन्याच्या एकूण मानधनापैकी 25 टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावण्यात आली आहे.
भारत विरूद्ध अफगाणिस्तानच्या सामन्यादरम्यान कोहलीने 29व्या षटकात ‘एलबीडब्लू’साठी पंच अलिम यांच्याकडे अपील केलं. पंचांनी फलंदाज नाबाद असल्याचं निर्वाळा दिल्यानंतरही विराटने अपील करणं थांबवलं नाही.
दरम्यान, आयसीसीच्या आचारसंहितेच्या नियम 2.1 अंतर्गत विराटला दोषी ठरवण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
-राष्ट्रवादीच्या कपटनीतीला मी बळी पडलो- आढळराव पाटील
-आमच्या धंद्यातही टेन्शन वाढलं; 244 आमदारांना बीपी अन् शुगर!- गुलाबराव पाटील
-“उद्धवजी आम्हा शेतकऱ्यांना इतकंही भोळं समजू नका…”
-पुढचा मुख्यमंत्री काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा आघाडीचाच; धनंजय मुंडेंचा विश्वास
-…तेव्हा मंत्रिपदाबाबत माझा नक्की विचार होईल- एकनाथ खडसे
Comments are closed.